

जोतिबा डोंगर - १८९९ मध्ये प्लेगची साथ आली आणि शाहू संस्थानास चैत्र यात्रेचा सोहळा रद्द करावा लागला. २०२० सालाच्या प्रारंभीच मार्चमध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनास ही ७ एप्रिल रोजी होणारी चैत्र यात्रा रद्द करण्याची वेळ आली आहे. म्हणजे तब्बल १२१ वर्षानंतर यंदा जोतिबाची चैत्र यात्रा भरणार नाही.
म्हणून डोंगरावर या काठीला मान
१८९९ साली जोतिबा डोंगरावर प्लेगची साथ होती परिणामी यात्रा बंद चा आदेश असतानासुद्धा निनाम पाडळी जिल्हा सातारा येथील काही ग्रामस्थ आपल्या गावची सासन काठी घेऊन जोतिबा डोंगरावर आले. आपला जीव धोक्यात घालून या पाडळीच्या ग्रामस्थांनी आपली सासनकाठी आणली म्हणून या प्रथम क्रमांकाची सासनकाठी म्हणून डोंगरावर या काठीला मान दिला आहे. याची नोंद सरकारी दरबारी आहे. त्याकाळी शाहू संस्थानने पाडळीच्या ग्रामस्थांचा गौरवही केल्याचे सांगितले जाते. आता चैत्रयात्रा बंद केल्याच्या आदेशामुळे या गावातील काही ग्रामस्थांनी या जुन्या आठवणींना उजळा दिला तसेच इतर अनेक आठवणी सांगितल्या.
१९०० साली पुन्हा डोंगरावर चैत्र यात्रा
१८९९ मध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्लेगची साथ आली. जिल्ह्यातील सर्व यात्रा प्रमुख सोहळे ही बंद करण्याचे आदेश शाहू महाराजानी दिले होते. त्यांनी त्या काळी विविध उपाययोजना करून ही साथ आटोक्यात आणली व १९०० साली पुन्हा शाहू राजांनी डोंगरावर चैत्र यात्रा भरवण्याचे आदेश दिले. पुन्हा ही यात्रा भरली.
यंदा कोट्यावधी रुपयांचे नुकसान
१९०० सालापासून जोतीबा डोंगरावर दरवर्षी चैत्र यात्रा भरली गेली. दरवर्षी डोंगरावर भाविकांना पाण्याची टंचाई भासू लागली परिणामी शाहू संस्थांनाने चव्हाण तळे, बेडूक तळे,कारदगेकराची विहीर या ठिकाणी गाळ काढून हे पाणी भाविकांसाठी पिण्यास उपलब्ध केले. चैत्र यात्रा झाल्या नंतर शाहु महाराज डोंगरावर स्वच्छता राहावी यासाठी ते आग्रही असत. पूर्ण जोतिबा डोंगर त्याकाळात स्वच्छ करून घेत असत. कोरोनाच्या निमित्ताने डोंगरावरील शाहू महारांजांच्या कामाच्या आठवणी आज ताज्या झाल्या.दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंदा जिल्हा प्रशासनाने सर्व तीर्थक्षेत्रे बंद केले आहेत. याचाच परिणाम म्हणून यंदा चैत्र यात्राही भरणार नाही. यंदा कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे.
त्यामुळे व्यापारी दुकानदार ग्रामस्थ पुजारी यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दरम्यान, यंदा ७ एपिलला ग्रामस्थ पुजारी यांनाच यात्रेतील सर्व विधी पालखी सोहळा काढावा लागणार आहे. भाविकांची मात्र यात्रेची परंपरा खंडीत होणार आहे .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.